Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसेचं शिष्टमंडळ शेतक-यांच्या मदतीसाठी राज्यपालांना भेटणार

मनसेचं शिष्टमंडळ शेतक-यांच्या मदतीसाठी राज्यपालांना भेटणार

मुंबई: ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतक-यांना सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे शेतक-यांना मदतीसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात यावे यासाठी मनसेचं शिष्टमंडळ आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची दुपारी पावणेबारा वाजता भेट घेणार आहेत.

शेतक-यांच्या समस्या सोडवण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या शिष्टमंडळाने यापूर्वी राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर आज मनसेचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहेत. सध्या शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यात सत्तास्थापन अजून झालं नाही. केंद्र सरकारने योग्य ती मदत केली नाही. त्यामुळे शेतक-यांचे अश्रू पुसण्यासाठी कुणी पुढाकार घेईल का अशी चर्चा सुरु आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी मदत जाहीर केली. २ हेक्टरपर्यंत शेती असलेल्यांना ही मदत जाहीर करण्यात आली. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये खरीप पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रूपयांची तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे शेतक-यांध्ये आक्रोश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments