Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत : संजय राऊत

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत : संजय राऊत

Sanjay Raut, Shiv Sena, Uddhav Thackerayमुंबई: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फुटणार नाहीत. कर्नाटक, गोवामध्ये आमदार फोडण्याचा घटना झालेल्या आहेत. पण महाराष्ट्रात आम्ही अशा गोष्टी होऊ देणार नाही, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितल.

राऊत यावेळी म्हणाले की, भाजपला सत्तास्थापनेची संधी मिळावी. भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. आमच्या शुभेच्छा भाजपासोबत आहेत. त्यांनी आपलं बहुमत सिद्ध करावं. चर्चेची कोंडी शिवसेनेकडून नाही. कर्नाटक, गोव्यासारखं घडू देणार नाही. शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही, शिवसेना आमदारांच्या फोडाफोडीच्या शंकेवरून, मुंबईतील हॉटेलमध्ये हलवण्याच्या वृत्ताबाबत राऊत यांनी खंडन केलं. आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत याची खात्री आहे.
शिवसेनेच्या वाऱ्याला उभं राहायची हिंमत कोणीही करून दाखवावी. शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही. त्यांना संपर्क करण्याची कोणाची हिंमत नाही, असं राऊत यावेळी म्हणाले.

राज्यात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत आमदार फोडाफोडीच्या गोष्टी होत असतात. अनेक राज्यांमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत. ज्या पक्षाकडे १४५ आकडा असेल त्यांनी आपलं सरकार बनवावं. मी केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका तुमच्या समोर मांडतो. मुख्यमंत्री आणि आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. या गोष्टींमुळे आमच्या व्यक्तीगत संबंधात कोणतीही बाधा येणार नाही. हा राजकीय प्रश्न महाराष्ट्राच्या भविष्याशी निगडीत आहे, असे राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments