Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईजोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्र राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची महापालिका आयुक्तांसोबत बैठक

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्र राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची महापालिका आयुक्तांसोबत बैठक

- जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विविध समस्यांबाबत होणार चर्चा - महानगरपालिकेच्या अंधेरी (पूर्व) येथील विभाग कार्यालयात बुधवार (२४ जुलै) सकाळी बैठकीचे आयोजन - शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी तसेच अधिकारी राहणार उपस्थित

मुंबई महानगरपलिकेच्या जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित तसेच सध्या सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याबरोबरच ही कामे नियोजित वेळात पुर्ण करता यावी, यासाठी गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्या सोबत बुधवारी बैठक बोलावली आहे.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात नवीन कल्पना राबवून तसेच भविष्यातील गरजा ओळखून विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी अनेक विकास कामे सुरू केली आहेत. यात पंपहाऊस तसेच संजय गांधी नगर येथील भुयारी मार्ग, जोगेश्‍वरी (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पुलाचे काम, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या वेरावलीपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील सुविधा, जोगेश्‍वरीतील रहिवाशांचे पुनर्वसन, जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोडवरील सर्विस रोड, आरे रॉयल पाम येथील इमारतींना भेडसावणारे प्रश्‍न, नवलक मार्केट व तेथील पुनर्वसन, प्रतापनगर हिंदू स्मशानभूमी विकासासाठी प्रकल्पबाधीत रहिवाश्यांचे पुनर्वसन, महाकाली गुंङ्गेवरील रहिवाशांचे पुनर्वसन व सुशोभिकरण, ऑबेराय स्प्लेंडर प्रकल्पातील झालेली अनियमीतता आदी प्रश्‍नांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर प्रथमच महापालिकेच्या अंधेरी (पूर्व) येथील कार्यालयात ही बैठक बुधवारी सकाळी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी बोलावली आहे. या बैठकीला नगरसेवक, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments