Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईशिवसेनेकडून सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव आला तर चर्चा करू : बाळासाहेब थोरात

शिवसेनेकडून सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव आला तर चर्चा करू : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thoratमुंबई : शिवसेनेकडून सरकार स्थापनेबाबत आम्हाला प्रस्ताव मिळाला नाही. अधिकृत प्रस्ताव आला तर त्याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू असे, माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.
थोरात म्हणाले की, जनमत भाजपाविरोधी आहे हे निकालाने दाखवून दिलं. जनमताचा कौल आम्हाला मान्य असून आम्ही विरोधीपक्ष म्हणून जनतेची सेवा करण्यचा पूर्ण प्रयत्न करू असे आ. थोरात यांनी सांगितले आहे. आम्हाला ४४ जागा मिळालेल्या आहेत, हा जनमताचा कौल आहे असं आम्ही समजतो. तसेच पाच वर्षे पुन्हा विरोधीपक्षात बसण्याची जबाबदारी आमच्यावर जनतेने दिली असं आम्ही मानतो. त्यामुळे आगामी पाच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीसह आमच्या मित्रपक्षांचा एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करण्याचा प्रयत्न राहील.
या निवडणुकीत एकंदर पाहिलं तर जनमताचा जो कौल आहे, तो सत्तेच्या विरोधी आहे असं आमचं मत आहे. जनमत पाहिलं तर जी सत्ता आहे, तिच्या विरोधी गेलेला हा कौल आहे हे स्पष्ट दिसते. असेही थोरात म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments