Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईबुधवारी कल्याण- डोंबिवली लोकलसेवा बंद राहणार!

बुधवारी कल्याण- डोंबिवली लोकलसेवा बंद राहणार!

Mumbai Localमुंबई : ठाकुर्ली रेल्वेस्थानकावर बुधवारी, २५ डिसेंबर रोजी पादचारी पूलाचे गर्डर उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण- डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळी ९.४५ ते दु. १.४५ या काळात ४०० मेट्रिक टन वजनी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर उभारण्याचे काम करण्यात येईल. यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक ५ तास पूर्णपणे बंद राहणार असून एकूण १६ मेल एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.

लोकल सेवेवर परिणाम

कल्याण-डोंबिवली दरम्यान स.९.१५ ते दु.१.४५ या वेळेत लोकल वाहतूक राहणार बंद

दर २० मिनिटांनी कल्याण-कर्जत/कसारा या मार्गावर विशेष फेऱ्या
दर १५ मिनिटांनी डोंबिवली/ठाणे-सीएसएमटी विशेष फेऱ्या
सीएसएमटी-दादर, कुर्ला, ठाणे या लोकल फेऱ्या वेळापत्रकानूसार

या मेल-एक्स्प्रेस २५ डिसेंबरला रद्द

-(११००९-११०१० ) सीएसएमटी-पुणे सिंहगड

-(१२१२३-१२१२४) सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन

-(१२१०९-१२११०) सीएसएमटी-मनमाड पंचवटी

-(२२१०१-२२१०२) सीएसएमटी-मनमाड राज्यराणी

-(१२०७१-१२०७२) दादर-जालना जनशताब्दी

-(११०२९-११०३०) सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी

-(५११५३-५११५४) सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments