Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत सेप्टिक टॅंकमध्ये गुदमरून तीन मजुरांचा मृत्यू

मुंबईत सेप्टिक टॅंकमध्ये गुदमरून तीन मजुरांचा मृत्यू

मुंबई :  सेप्टिक टॅंक स्वच्छ करत असताना तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गोवंडी येथील रहेजा कॉम्पलेक्सजवळ गणेशवाडी येथे घडली. तीन खासगी मजूर साफसफाईचं काम करत असताना सेप्टिक टँकमध्ये अडकले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मात्र त्यांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले होते, तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुंबई आणि आसपासच्या परिसरात अशा प्रकारे सेप्टिक टँकमध्ये अडकून मृत्युमुखी पडणाऱ्या कामगारांचं प्रमाण वाढत असल्याची बाब एका जनहित याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. १७ डिसेंबर रोजी मुंबई हायकोर्टाने या जनहित याचिकेवर सुनावणी देताना राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मे २०१९, मध्ये नालासोपारा येथे असाच तीन मजूरांचा साफसफाई करत असताना सेप्टिक टँकमध्ये गुदमरून मृत्यू झाला होता. याच महिन्यात, ठाण्यातील ढाकोली भागात अशीच घटना घडली होती. तेथेही तिघे कामगार गुदमरून मृत्युमुखी पडले होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments