Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआयपीएस अधिकाऱ्याचा 'या' विधेयकाविरोधात राजीनामा

आयपीएस अधिकाऱ्याचा ‘या’ विधेयकाविरोधात राजीनामा

IPS Officer Abdur rahman,Abdurrahman,IPS,Twitter,Billमुंबई: नागरिकत्व सुधारणा विधेयक बुधवारी राज्यसभेत मंजूर झालं. त्यापूर्वी भारताच्या ईशान्य भागत प्रदर्शन सुरु झाले. विधेयकाविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यातील आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी राजीनामा दिला आहे. बुध्दीजी वर्गातून विधेयकाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

ट्विटर काय सांगितलं…

अब्दुर रहमान यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली. नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या धार्मिक बहुमत विरोधात असल्याचे रहमान यांनी सांगितले. सर्व न्यायप्रेमींनी लोकशाही पद्धतीने या विधेयकाला विरोध करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. नागरिकत्वाच्या विधेयकाच्या समर्थनासाठी गृहमंत्री देत असलेला तर्क चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments