Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमराठवाडाबीडयापुढे 'गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून' काम करणार : पंकजा मुंडे

यापुढे ‘गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून’ काम करणार : पंकजा मुंडे

bjp pankaja munde gopinath gad beed parliपरळी: मी पक्ष सोडणार नाही. पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात. मी राज्यभर दौरा करणार. मी या पुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार, असं पंकजा मुंडे यांनी मेळाव्यात जाहीर केलं.

दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमत्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. गोपीनाथ मुंडेंचा प्रवास मृत्यूनंतरही कायम आहे ही किमया आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. सामान्य माणसाचा, वंचितांचा नेता म्हणू त्यांच्याकडे आजही आदराने पाहिलं जातं असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी कोणी लावली याचा शोध घ्यावा, असं यावेळी पंकजा मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितलं. “मी पक्ष सोडणार की नाही याचं उत्तर पक्षानं द्यावं. ते दिलं तरी लोकांच्या मनात शंका आहे. पंकजा मुंडे दबाब आणत असल्याचं काहीजण म्हणत आहेत,” असं यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितलं. कोअर कमिटीमधून मला मुक्त करावं अशी मागणी यावेळी पंकजा मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

शेवटच्या दिवसापर्यंत भाजपाचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी मी प्रयत्न करत होते. आणि मी बंड करणार अशी पुडी कोणी सोडली. माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही, असं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. पक्ष कोणाचाच नसतो. स्वत: मोदीदेखील मी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं सांगतात असं सांगताना बेईमानी आमच्या रक्तात नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. हा पक्ष माझ्या बापाचा आहे सांगत पंकजा मुंडे यांनी आपण अद्यापही पक्षात राहणार असल्याचं जाहीर केलं.

स्वर्गात सुद्धा श्री नसेल तर राजालाही काही अर्थ नसतो. लक्ष्मी नसेल तर समुद्र मंथन करुन बाहेर काढावं लागतं. लक्ष्मी हरवली आमची. तोंडचा घास आम्हाला घेता आला नाही. अमित शाह, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कष्टाचं चीज व्हावं असं वाटत होतं. पण आता मी काम करणार,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments