Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभांडूप मॉलमधील आग प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करणार: पोलीस आयुक्त हेमंत...

भांडूप मॉलमधील आग प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करणार: पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

hemant-nagrale-has-ordered-a-probe-in-the-bhandup-fire-incident-news-updates
hemant-nagrale-has-ordered-a-probe-in-the-bhandup-fire-incident-news-updates

मुंबई: भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला निष्काळजीपणातूनच आग लागली असून या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस हॉस्पिटलला लागलेल्या आगीची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सनराईस हॉस्पिटलला लागलेली आग अत्यंत भीषण आहे. निष्काळजीपणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच आगीला रुग्णालयातील कोण कोण जबाबदार आहेत, त्याचा तपास करण्यात येणार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं नगराळे यांनी सांगितलं.

10 जणांचा मृत्यू

सनराईस रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दहा जणांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यात दोन कोरोना रुग्णांचा समावेश असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. या मॉलला रात्री 12च्या सुमारास आग लागली. आग अत्यंत भीषण असल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी 11 तास लागले. आग नियंत्रणात आली असली तरी अधूनमधून आग भडकत असल्याचं अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

bhandup-fire-incident

हेही वाचा: हाहाकार: भांडुपमध्ये कोविड रुग्णालयाला आग; १० जणांचा होरपळून मृत्यू 

61 जणांना बाहेर काढलं

या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून रुग्णालयातील 61 जणांना सुखरूप बाहेर काढलं. आगीत अडकलेल्या चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. तब्बल 11 तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

मुख्यमंत्री,महापौर,विरोधी पक्षनेत्यांनी घटनास्थळी केली पाहणी

दरम्यान, भांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महापौरांनी घटनेची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले. तसेच ड्रिम मॉलमध्ये रुग्णालय कसं बनविण्यात आलं? याबाबत महापौरांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक यांनी घटनास्थळी जाऊन आगीची पाहणी केली. तसेच पोलिसांकडून या घटनेची माहिती घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केली पाहणी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments