skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकुर्ल्यातील घराला आग, ४ लहान मुलांसह ८ जण जखमी

कुर्ल्यातील घराला आग, ४ लहान मुलांसह ८ जण जखमी

मुंबई – मुंबईत आज दोन ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना साकिनाका व कुर्ला येथे घडल्या आहेत. कुर्ल्यातील एका घराला लागलेल्या आगीत २ महिला व ४ लहान मुले जखमी झाली आहेत.

साकिनाका येथील एका इमारतीला आग लागली. तर, कुर्ल्यातील ठक्कर बाप्पा येथील एका घरातही आग लागल्याची घटना घडली. जगदीश जाटोलिया यांच्या घरी चप्पल तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक आग लागली. या आगीत एकूण ८ जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये २ महिला व ४ लहान मुले जखमी झाली आहेत. जखमींमध्ये साडेतीन महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. या सर्वांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आगीची माहिती कळविताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. परंतु, त्यापूर्वीच ही आग विझवण्यात यश आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments