Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकाँग्रेसच्या अंमलबजावणी समिती प्रमुखपदी माजी खा.डॉ. मुणगेकर

काँग्रेसच्या अंमलबजावणी समिती प्रमुखपदी माजी खा.डॉ. मुणगेकर

Bhalchandra Mungekar

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून प्रसंगानुरुप विविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात. प्रदेश पातळीवर राबविण्यात येणा-या कार्यक्रमांचा समन्वय साधून पाठपुरावा करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ‘कार्यक्रम अंमलबजावणी समिती’ (Programme Implementation Committee) गठित केली. समितीचे प्रमुख म्हणून माजी खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची व सदस्य म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मनिष राऊत व श्रीमती शानी नौशाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments