Sunday, April 28, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमौन मोदींचे कान टोचले!

मौन मोदींचे कान टोचले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मनकी बात’च्या माध्यमातून मनात आलं तस बरडतात. जनतेचही चांगलचं मनोरंजन होत. परंतु हेच मोदी देशातील भ्रष्टाचार, अत्याचार, दंगली, एकात्मता, रोजगार, उद्योग, व्यापार याच्यावर चकार शब्दही काढत नाहीत. हेच मोदी जेंव्हा विरोधी पक्षात होते तेंव्हा त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे बोलत नाही. मौन बाळगातात अशी त्यांची खिल्ली उडवायचे. आता हेच मोदी चार वर्षापासून देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेत मात्र ते देशातील कोणत्याही समस्येवर बोलत नाही. पत्रकार परिषदा घेत नाही. उणावा, कठुआ, सुरत येथे बलात्काराच्या,खूनाच्या घटना घडल्यानंतर पंतप्रधान काहीच बोलायला तयार नाहीत. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी मोदींना प्रश्न विचारला, तुम्ही मला सल्ले देत होतात आता मोदी तुम्हीच ते अंमलात आणा. असे कान टोचले. असं म्हटलं जात की, ‘बारी सबकी आती है’ आणि ती संधी मनमोहनसिंगला मिळाली आणि त्यांनी त्याची परतफेड केली.खरतर कमी बोलणे हे चांगल्या बुध्दीजीवी लोकांची लक्षणे असतात. मात्र पंतप्रधान मोदी देशातील कोणत्याही विषयावर तर बोलत नाही आणि संसदेतही बोलत नाही. संघाच्या मुशीतून तयार झालेली मंडळी बोलण्यात फार पटाईत असते. ‘खोट बोला, पण रेटून बोला’ असा त्यांचा एक कलमी कार्यक्रम राबवत असतात. पंतप्रधान मोदी हे संसदेतही बोलत नाही. विरोधकांनी पंतप्रधानांना काही तरी बोला उत्तर द्या मात्र कोणत्याही विषयावर पंतप्रधान बोलले नाही. नीरव मोदी, मेहूल चौकशी कोट्यवधी घोटा प्रकरण, राफेल घोटाळा, महागाई, रोजगार या विषयावर पंतप्रधान चकार शब्दही बोलले नाही. अधिवेशनाचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाया गेल्यात. खरतर पंतप्रधानांकडे बोलण्यासारखे काहीच नाही. विरोधकांनी विचारल्यानंतर त्याची उत्तरे द्यावी लागली. चार वर्षात सरकारन कोणतही ठोस, काम केलं नाही. पंतप्रधात परदेश दौरे करुन एक रेकॉर्ड बनवला. हजारो कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. परंतु एक रुपयाची विदेशातून भारतात गुंतवणूक झाली नाही. आज देशात दलित, अल्पसंख्यांक, महिलांवर अत्याचार वाढले परंतु कोणतीही ठोस भूमीका सरकार घ्यायला तयार नाही. महागाईने जनता होरपळून चालली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. पंतप्रधान मोदी हे प्रचार सभांमध्ये विदेशात गेल्यानंतर बाता मारतात. परंतु सभागृहात त्यांच्या तोंडातून चकार शब्दही निघत नाही. पत्रकार परिषद घेतली तर ते पत्रकारांचे उत्तर देऊ शकणार नाहीत. देशातील लोकशाही धोक्यात आली. सर्वसमाजांमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात संताप वाढत चालला आहे. पंतप्रधान मन की बात,विदेशात जे बोलतात ते खोटचं असतं. महत्वाच्या मुद्यांवर मौन बाळगू नये असा सल्ला माजी पंतप्रधान डॉ.सिंग यांनी दिल्यामुळे पंतप्रधान मोदी त्याची खरच अंमलबजावणी करतील का हाच खरा प्रश्न आहे.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments