Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रयंदा धो-धो पाऊस पडणार?

यंदा धो-धो पाऊस पडणार?

monsoonमुंबईसर्वत्र उन्हाचे चटके सहन करणाऱ्या आणि बळीराजासाठी  स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने आनंदाची बातमी दिली आहे. यंदा देशभरात  धो-धो पाऊस पडेल, मान्सून चांगला राहील. असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरीच्या १००% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊस असणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊस सामान्य राहील. इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक १११ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच ९६ टक्के पाऊस पडेल. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या महिन्यात किती पाऊस?
.जूनमध्ये १११ टक्के पाऊस

.जुलैमध्ये ९७ टक्के पाऊस

.ऑगस्ट ९६ टक्के पाऊस

.सप्टेंबर १०१ टक्के पाऊस

भारतीय हवामान खात्याचा अंदाज
भारतीय हवामान खात्यानेही गेल्या महिन्यात २ मार्चला पावसाचा अंदाज वर्तवला होता.
यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आयएमडीने वर्तवला. ला नीनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती सुधारल्याचेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. पाऊसकाळ चांगला राहण्याची शक्यता वाढली आहे.
ला नीनाची ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जूनपर्यंत दाखल होईल आणि पाऊस चांगला होईल, असे असं हवामान खात्यानं म्हंटलं आहे.

 सरासरी पाऊस असा

८८७. मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या १९ टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो. २०१७ मध्ये १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. २०१६ मध्ये सरासरीच्या १०६ टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता. देशभरात ८६२ मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या टक्के कमी होता. तरी त्याला तांत्रिकदृष्ट्या सरासरीच मानलं गेलं.
२०१४ आणि २०१५ ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. २०१४ मध्ये सरासरीच्या १२ टक्के कमी म्हणजे ७८१., तर २०१५ मध्ये सरासरीच्या १४ टक्के कमी म्हणजे ७६०. मिमी एवढा पाऊस पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments