Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतळीरामांचे वांधे : ऑक्टोबर महिन्यात चक्क 8 दिवस 'ड्राय डे'!

तळीरामांचे वांधे : ऑक्टोबर महिन्यात चक्क 8 दिवस ‘ड्राय डे’!

Dry Dayमुंबई : तळीरामांना दररोज झिंगाट होण्यासाठी दारू लागतेच. ते ड्राय डेच्या दिवशी सोय करून ठेवतात. परंतु ऑक्टोबर महिन्यात तळीरामांचे चांगलेच वांधे होणार आहेत. एक नव्हे दोन नव्हे चक्क आठ दिवस ड्राय डे येणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील तळीरामांचे खूप हाल होणार आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिला ड्राय डे असणार आहे. बुधवारी 2 ऑक्टोबरला गांधी जंयती असल्याने या दिवशी विदेशी मद्य, देशी दारू, ताडीची दुकाने बंद राहणार आहेत. त्यानंतर लगेचच दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी 8 ऑक्टोबरला दसरा असल्याने दारुची दुकाने बंद राहतील. तसेच रविवारी 13 ऑक्टोबरला वाल्मिकी जयंती असल्याने दारुची दुकाने बंद राहणार आहेत.

त्याशिवाय सोमवारी 21 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी 48 तास मद्यविक्रीस मनाई करण्यात येते. त्यामुळे शनिवार 19 ऑक्टोबर, रविवार 20 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राज्यात मद्यविक्री होणार नाही.

सोमवारी 21 ऑक्टोबर विधानसभेसाठी मतदान होणार असल्याने त्या दिवशी दारुची दुकानं बंद असणार आहेत. तर गुरुवारी 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार असल्याने त्या दिवशीही दारु विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रविवारी 27 ऑक्टोबरला नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन असल्याने विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने बंद राहणार आहेत. या सर्व प्रकारामुळे तळीरामांचा चांगलाच मनस्ताप होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments