Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रचिंताजनक : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४७ वर

चिंताजनक : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४७ वर

Coronavirus patients in Mumbai, coronavirus, mumbai coronavirus, maharashtra, uddhav thackerayमुंबई : मानगुटीवर बसलेला कोरोनाचा भूत मोठ्याप्रमाणात हातपाय पसरवत आहे. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये करोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. या दोन्ही करोना रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. सध्या महाराष्ट्रात ९५८ संशयित रुग्ण आहेत.

कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उल्हासनगरमध्ये एका ४९ वर्षीय महिलेला करोना रुग्णाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. ही महिला दुबईहून प्रवास करून आली होती. विमानतळावर तिची तपासणी करण्यात आली असता या महिलेला करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे या महिलेला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्याशिवाय मुंबईतील एका २२ वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली आहे. ही तरुणी ब्रिटनमधून आली होती. त्यामुळे तिच्यावरही विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ४७वर पोहोचली असून देशातील करोना रुग्णांची संख्या १७१वर पोहोचली आहे.

राज्यातील रुग्ण…

मुंबई ९, पिंपरी चिंचवड ११, पुणे ८, यवतमाळ ३, रायगड १, ठाणे १,कल्याण, नवी मुंबई ३, औरंगाबाद १, अहमदनगर १, रत्नागिरी १, उल्हासनगर १

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments