Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
HomeदेशCoronavirus | पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार

Coronavirus | पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार

coronavirus pm narendra modi will address nation today नवी दिल्ली : चीन मधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची लागण भारतातही मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधणार आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत देशात 151 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर तीन जणांचा यात मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान कार्यालय पीएमओने यांसदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मार्च 2020 रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ज्यामध्ये ते कोरोना व्हायरस संबंधित मुद्दे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत.’

देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ

सध्या देशांत कोरोना बाधितांची संख्या वाढून 151 झाली आहे. त्यापैकी 25 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 45 कोरोना बाधित आहेत. तर महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रूग्ण केरळमध्ये आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments