Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकाँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सत्तेत येणार : शरद पवार

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सत्तेत येणार : शरद पवार

मुंबई : किती जागा येणार हे सांगता येणार नाही, परंतु काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तेत येणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
शरद पवार हे मतदानासाठी मलबार हिलमध्ये  आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध मतं व्यक्त केली. पवार म्हणाले की, मला मतदानामध्ये सहभागी व्हायचा आनंद नेहमी असतो. अलीकडे गेल्या पाच वर्षात मी मुंबईत मतदान करतो आहे. माझं मतदान पूर्वी बारामतीत असायचे. आता मुंबईमध्ये मलबार हिलमध्ये आहे. असेही ते म्हणाले.
मलबार हिल या विभागातील लोक आरामात मतदानाला जातात. पण ज्या पद्धतीने जात आहेत. यावरुन लोक मलबार हिल हा अनुकूल आहे असे दिसते. मुंबईत ढगाळ  वातावरण असलं तरी लोक सहभागी होतात. यावरुन लोक काहीतरी बदल करण्याच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. माझी खात्री आहे की परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि आवश्यक त्याची पूर्तता लोक या मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात करतील, असेही शरद पवार म्हणाले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments