Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमराठवाडाजालनारावसाहेब दानवेंच्या जिल्ह्यात भाजप – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

रावसाहेब दानवेंच्या जिल्ह्यात भाजप – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Raosaheb Danve,danve,bjp,ncpजालना – जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बदनापुर मतदारसंघातील जामखेड गावात, मतदान केंद्रावर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीत जामखेड गावच्या उपसरपंचासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पोलिंग एजंट गंभीर जखमी झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मतदारसंघाताली दहीटने गावात मतदान प्रक्रियेदरम्यान हाणामारीची घटना घडल्याचे समोर आली आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप नारायण पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments