Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Uddhav Thackeray shivsenaमुंबई: आरे आंदोलनात नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सर्व नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश आज देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी रात्री माध्यमांशी बोलताना दिली.

आरे जंगलात मेट्रो कारशेडच्या कामासाठी झाडांची कत्तल करण्यात आली होती. झाडांच्या कत्तलीला पर्यावरण प्रेमी आरेच्या आपसच्या वसाहतींमधील नागरिकांनी विरोध केला होता. त्यावेळी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये बहुतांश विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आज अधिवेशनात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी गुन्हे मागे घे्ण्याचे आदेश दिले.

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आरे जंगलातील मेट्रोच्या कामाला स्थगिती दिलेली आहे. तसेच पुढील चौकशी होईपर्यंत झाडाच्या पानालाही हात लावता येणार नाही. असे ठणकावून सांगितले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments