Placeholder canvas
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईछोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश बंदी

छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश बंदी

Deepak Nikaljeमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजेला अटकेपासून मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलासा दिलाय. ११ जूनपर्यंत निकाळजेला अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. पनवेल पोलीस स्थानकात निकाळजेविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र अटकेपासून दिलासा देताना हायकोर्टानं पीडीत मुलगी राहत असलेल्या नवी मुंबईत निकाळजेला प्रवेश बंदी केली आहे. गरज असल्यास तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच दिपक निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश करता येईल.

साल २०१४ पासून तक्रारदाराशी संबंध असल्यानं संगनमतानंच शरीरसंबंध ठेवल्याचा याचिकाकर्त्यानी हायकोर्टात दावा केला आहे. साल २०१४ ते २०१८ या काळात सदर तरुणी आपल्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. आपल्याशी लग्न न केल्यास या संबंधांची माहीती माझ्या पत्नीला देण्याची धमकीही ही तरुणी देत असे अशी माहीती निकाळजेनं कोर्टाला दिली. दरम्यान ती आपल्यासोबत एकदा काश्मिरलाही आली होती. असा दावाही निकाळजेच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला आहे.

कोर्टाने दीपक निकाळजेला अटक न करण्याचा आदेश दिला असला तरी त्याला नवी मुंबईत प्रवेश बंदी करण्यात आला आहे. पीडीत मुलगी नवी मुंबईत राहत असल्याने कोर्टाने दीपक निकाळजेवर प्रवेश बंदी घातली आहे.

नेमकं प्रकरण काय?
लग्नाच्या आमिषाने दीपक निकाळजेने बलात्कार केल्याचा आरोप २२ वर्षीय युवतीने केला होता. आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत, तसंच शिक्षणाचा खर्च करु, असं सांगून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन निकाळजेने बलात्कार केला, असा आरोप नवी मुंबईत राहणाऱ्या एक युवतीने केला होता. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नवी मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग केलं होतं.

युवतीने काय म्हटले आहे तक्रारीत
युवतीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, २०१४ मध्ये ती कुर्ला येथे आपल्या मामाकडे आली असताना दीपक निकाळजेची तिच्यावर नजर पडली. तिच्या कुटुंबासोबत लगट करुन, तिला पैसे आणि लग्नाचं आमिष निकाळजेने दाखवलं. कर्जत येथील एका फार्म हाऊसवर आपल्या ऑडी कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे.
या मुलीने लग्नाची मागणी केली असता तिला मारहाण सुद्धा करण्यात आली. पोलीस तक्रार करु नये म्हणून दीपक निकाळजेची बहीण आणि मेहुण्याने दबाव आणल्याचा आरोपही तक्रारदार युवतीने केला आहे.
तरुणीने टिळकनगर पोलिसात १८ मार्चला तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जिथे हा प्रकार घडला त्या नवी मुंबईतील परिमंडळ २ कडे वर्ग करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments