Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभुजबळांच्या सत्कारावेळी बालाजीची शाल, बुधा हलवाईचे पेढे

भुजबळांच्या सत्कारावेळी बालाजीची शाल, बुधा हलवाईचे पेढे

Chhagan Bhujbalमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ केईएम रुग्णालयातच आहेत.  यावेळी त्यांच्या समर्थकांनी भुजबळांना बालाजीची शाल, नाशिकच्या बुधा हलवाईचे पेढे, मोठा हार घालून सत्कार केला.
भुजबळांच्या भेटीसाठी नाशिकमधील कार्यकर्ते हळूहळू मुंबईत दाखल होत आहेत. भुजबळांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधार असल्याचे बोलले जात आहेत. यासाठी पक्षातर्फे तसेच समता परिषदेतर्फे जोरदार तयारी सुरु आहे.

फेसबुक लाईव्ह ऱद्द
छगन भुजबळ आज समर्थकांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र ते रद्द झालं आहे. भुजबळ जाहीर सभेतून संवाद साधणार असल्यामुळे फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समजते.

डॉक्टरांच्या सल्यानंतर घरी निर्णय घेणार
”केईएमचे डॉक्टर्स उत्तम उपचार देत आहेत. कुटुंबीयांशी चर्चा करुन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर घरी जाण्याचा निर्णय घेऊ,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments