Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणठाण्यात मोदींच्या 'बुलेट'ला राजचे 'इंजिन’ भिडले!

ठाण्यात मोदींच्या ‘बुलेट’ला राजचे ‘इंजिन’ भिडले!

Raj Thakeray, PM Modi, Bullet Trainमहत्वाचे…

  • मोजणीवेळी मनसैनिकांचा गोंधळ
  • मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोजणीची मशीन फेकून दिली
  • पोलिसांचा बंदोबस्त झुगारुन आंदोलन

ठाणे: मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनविरोधात भूमिका घेतल्यावर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शीळफाटा परिसरात बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेली जागेची मोजणी मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडली आहे. यामुळे मोदींच्या बुलेट ट्रेनला राज यांच्या इंजिनचे अडथळे निर्माण झाले आहेत.

जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोजणीची मशीन फेकून दिली. पोलिसांचा बंदोबस्त झुगारुन हे आंदोलन करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना जमिनी देऊ नका असे आवाहन केलेले आहेत. नाणार प्रकल्पावरुनही गुजराती लोकांनी कोकणातील जमिनी प्रकल्प येण्यापूर्वी कवडीमोल भावात कशा काय घेतल्या होत्या. असा सवाल जाहीर सभेमध्ये उपस्थित केला होता. मनसेचा विरोध वाढला तर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव रेंगाळण्याची दाट शक्यता निर्माण होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments