Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईCAA : दिल्लीसह हैदराबाद, नागपूर आणि औरंगाबादेत निदर्शने

CAA : दिल्लीसह हैदराबाद, नागपूर आणि औरंगाबादेत निदर्शने

Protest at Jama Masjidमुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. विशेष म्हणजे आज दिल्लीसह हैदराबाद, नागपूर, नाशिक, औरंगाबादमध्ये आज शुक्रवारी कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

संतप्त नागरिकांनी कायद्याला विरोध करत मोर्च्यांमध्ये हजेरी लावली. विशेष म्हणजे हा कायदा संविधान विरोधी असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. गुरुवारी मुंबईत होणा-या आंदोलनात अठराहून अधिक विद्यार्थी संघटना एकत्र आल्या होत्या. मोदी सरकार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला होता. सध्या देशभरात या कायद्याविरोधात जाळपोळ, निदर्शने, धरणे, बंद, या प्रकारचे आंदोलन करुन कायद्याचा विरोध केला आहे. निवेदन सादर करुन कायदा मागे घेण्याची मागणी केली जात आहे. यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

विविध शहरांमध्ये आंदोलन सुरु आहेत. दिल्ली, कोलकत्ता, पश्चिम बंगाल, मुंबई, पुणे, औरंगाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केली. त्यापाठोपाठ सर्वत्र आंदोलन सुरु झाले आहेत. अनेक कलाकारांनी नागरिकत्व कायद्याविरोधात भूमिका मांडली आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील काही विद्यार्थांनी सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लिम विरोधी आहे, असं म्हणत आंदोलन केले होतं. या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याविरोधात देखील अनेक कलाकारांनी संताप व्यक्त करत ट्विट केले होतं. कायद्याविरोधात सर्वत्र भडका उडाल्यामुळे देशात अशांतता पसरली आहे. सामाजिक कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी, तरुण, तरूणींकडून सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन केलं जात आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत.

विविध शहरांमध्ये आंदोलन सुरु आहेत. दिल्ली, कोलकत्ता, पश्चिम बंगाल, मुंबई, पुणे, औरंगाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केली. त्यापाठोपाठ सर्वत्र आंदोलन सुरु झाले आहेत. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील काही विद्यार्थांनी सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लिम विरोधी आहे, असं म्हणत आंदोलन केले होतं. या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याविरोधात देखील अनेक कलाकारांनी संताप व्यक्त करत ट्विट केले होतं. कायद्याविरोधात सर्वत्र भडका उडाल्यामुळे देशात अशांतता

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments