Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांच्या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाचा विरोध

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांच्या उमेदवारीला ब्राम्हण महासंघाचा विरोध

मुंबई: भाजपच्या कोथरूड मतदारसंघात गोंधळ उडाला आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. मात्र, याला ब्राम्हण महासंघाने विरोध केला आहे. चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव करु असा इशारा दिला आहे.

विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारण्यात येईल अशी चर्चा आहे. व कोथरूडमधून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारण्यात येणार, अशी माहिती कार्यकर्त्यांना मिळताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. विशेष म्हणजे ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी चंद्रकांत पाटलांच्या कोथरूडमधून उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.  पाटील यांना उमेदवारी दिली तर त्यांचा पराभव करु असा इशारा दिला आहे. दवे यांनी भाजपच्या सरकारच्या कामकाजावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाराजी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments