Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईगोंधळ: युतीमध्ये उमेदवारी जाहीर होताच भूकंप होणार!

गोंधळ: युतीमध्ये उमेदवारी जाहीर होताच भूकंप होणार!

BJP Shiv Sena Devendra Fadnavis Udhav Thackerayमुंबई: विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस शिल्लक आहेत. मात्र, युतीने अद्यापही उमेदवारी जाहीर केली नाही. युतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीतील आयारामांमुळे गोंधळ उडालेला आहे. युतीमध्ये उमेदवारांची घोषणा होताच नाराज इच्छूक उमेदवार पक्षातून बाहेर पडण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे उमेदवारांची घोषणा रखडली आहे.

युतीमध्ये उमदेवारांच्या नावावर अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाही. भाजपामध्ये सध्या आयारामांचा प्रवेश सुरुच आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी दोन वेळा दिल्लीवारी केली. उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र अद्यापही उमेदवारांची घोषणा का केली जात नाही असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

शिवसेना,भाजपाचे नेतेही गोंधळ उडालेले आहेत. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करुन बाजी मारली आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रामावस्थेत आहेत. त्यामुळे उमेदवारांची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments