Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजपचं शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांना भेटणार

भाजपचं शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांना भेटणार

मुंबई: राज्यात शिवसेना भाजपात पेच कायम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचं शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.

राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीवर चर्चा करणार असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना सांगितलं. मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटून राजकीय परिस्थितीची माहिती देणार असल्याचं सांगितले. मात्र, सत्ता स्थापनेचा दावा करणार की नाही याचीच उत्स्कूता लागलेली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेनेचा एकही प्रतिनिधी नसणार आहे. शिवाय राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. सत्तेचा दावा सादर केला जाणार नसल्याचे संकेत मुनगंटीवार यांनी दिल्यानेही या भेटीला विशेष महत्त्वप्राप्त झालं आहे. या भेटीत राष्ट्रपती राजवटीवर चर्चा केली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद झाली यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपने सरकार स्थापन करावी अस विधान केल होत. त्यामुळे भाजपची काय भूमिका आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments