Placeholder canvas
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईभाजपाने स्विकारलं दहतवाद्यांना फंडिंग करणा-या कंपनीकडून निधी

भाजपाने स्विकारलं दहतवाद्यांना फंडिंग करणा-या कंपनीकडून निधी

मुंबई : नोटबंदीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांची कंबर मोडली जाईल असं सांगितलं होतं. मात्र त्याच दहशतवादी संघटनांना फंडिंग करणा-या कंपनीकडून भाजपने २०१४-१५ मध्ये आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडकडून १० कोटींची देगणी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपाला मुंबईमधील अॅक्सिस बँकेच्या वांद्रे शाखेच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहे.

आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेड विरोधात दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) तपास सुरु आहे. भाजपाने निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या देणगींसंदर्भात दिलेल्या माहितीत हे उघड झालं आहे. यानुसार, २०१४-१५ मध्ये आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडकडून १० कोटींची देगणी घेतली आहे.

भाजपाकडून निवडणूक आयोगाला देणगींसंबंधी जी माहिती देण्यात आली आहे, त्यामध्ये देणगी देणाऱ्यांच्या यादीत आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडचं नाव २६ व्या स्थानावर आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशा अजून काही कंपन्या आहेत का याचीही जोरदार चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments