मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी बंड पुकारला होता. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मु्ख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंर 79 तासानंतर दोघांनी राजीनामा दिला. आज अजित पवार पुन्हा महाआघाडीच्या बैठकीत हजेरी लावणार आहेत.
महाविकास आघाडीचे सर्व आमदार,नेते ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहेत. यावेळी अजित पवार हे हजेरी लावणार आहेत. अजित पवार हे खासदार सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासोबत येणार आहेत. या हॉटेलमध्ये सर्व आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी, प्रा.जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थितीत राहून मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात बुधवारी बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह टेलिकास्ट प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत.