Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेसबरोबर गेले नसते : नारायण राणे

बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेसबरोबर गेले नसते : नारायण राणे

Narayan Rane, BJP, Shiv Senaमुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालावर भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर ते काँग्रेसबरोबर कधीच गेले नसते. तसेच, सोनिया गांधी देखील आपली विचारसरणी सोडून शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाबरोबर जातील, असं वाटत नव्हतं. असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

राणे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने भाजपा विरोधात निर्णय दिलेला नाही. न्यायालयाने केवळ मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे उद्याचा विश्वासदर्शक ठराव भाजपा सरकार जिंकणार आहे, असा त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, शिवसेनेला संविधानाचं काही देणंघेणं नाही, त्यांच्या बोलण्याची दखल घेतली जाऊ नये, असं देखील यावेळी राणे यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने भाजपा विरोधात निर्णय दिलेला नाही. विश्वासदर्शक ठरावासंबंधी न्यायालयाने मार्गदर्शन केलं आहे. हा निर्णय म्हणजे शिवसेनेच्या बाजूने होत नाही. असंही राणे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments