मुंबई: आपल्या हक्काचा पैसा आपल्याच मिळणार नाही. हे ऐकल्यावर प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकणार हे साहजिक आहे. पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक व्यवहाराची घटना समोर आल्यानंतर एका ग्राहाकाला हृदयविकाराचा झटका आला. ग्राहकावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. 35 वर्ष जुनी बॅंक डबघाईस आली आहे.
पुढील सहा महिन्यांसाठी बंद झाल्याने खातेदारांची तारांबळ उडाली आहे. काही संतप्त ग्राहाकांनी बॅंकेसमोर लांबच लांब रांगा लावल्या. काही ग्राहकांनी दगडफेक केली. तरी सुध्दा कर्मचा-यांडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाही. अवघ्या एक हजार रुपयांमध्ये कसे निभावणार याच चिंतेने विरारमधील मनवेलपाडा येथे राहणाऱ्या राजेंद्र वाघोलीकर (वय ५२) खातेदारांना हृदयविकाराचा झटका आला.
वाघोलीकर यांचा मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसायातून मिळालेला पैसा बँकेत सुरक्षित राहावा, यासाठी त्यांनी घराजवळील पंजाब-महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मनवेल पाडा शाखेत खाते उघडले. बँकेच्या व्यवहारांवर पुढील सहा महिने र्निबध आल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर प्राप्त झाला. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने तातडीने बँकेत धाव घेतली होती. तेव्हा बँक समोरील गर्दी पाहून त्यांचा छातीत धडकी भरली.
जेव्हा हा प्रकार समोर आला तेव्हा आता कुटुंबाचे काय होणार, या चिंतेने त्यांच्या अंगाला घाम फुटला व त्यांना अस्वस्थ वाटू लागले. एक हजार रुपयांत घर कसे चालवणार याच विचाराने त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना तातडीने महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला पाठवण्यात आले. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे.