मुंबई : मुंबई मॅरेथानमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूचा आज रविवार (१९ जानेवारी) पहाटे ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गजानन माळजळकर ( ६४) असं मृत्यू झालेल्या स्पर्धकाचं नाव आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणून मुंबई मॅरेथॉनची ओळख आहे. या गजानन माळजळकर हे ४ किलोमीटर पर्यंत धावले. त्यानंतर ते खाली कोसळले. उपचारासाठी त्यांना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले.
Bombay Hospital PRO, #Mumbai: 64-year-old Gajanan Maljalkar died of cardiac arrest while running the Tata Mumbai Marathon today morning. He was declared brought dead. Total 7 people suffered heart attack during the run today. All 7 people are under treatment at the hospital.
— ANI (@ANI) January 19, 2020