Placeholder canvas
Sunday, May 12, 2024
Homeदेशकाँग्रेस नेते हार्दीक पटेलांना ‘या’ कारणामुळे अटक!

काँग्रेस नेते हार्दीक पटेलांना ‘या’ कारणामुळे अटक!

Hardik Patelअहमदाबाद : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्यावर २०१५ मध्ये देशद्रोहाच्या गुन्हा दाखल आहे. सुनावणी दरम्यान हार्दिक पटेल सातत्याने अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

हार्दीक पटेल यांना शनिवारी रात्री अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगाव येथून अटक करण्यात आली. देशद्रोहाच्या प्रकरणात पटेल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अहमदाबादच्या न्यायालयाने हार्दिक पटेल यांच्याविरोधात शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सुनावणी दरम्यान हार्दिक पटेल सातत्याने अनुपस्थित राहिल्यामुळे अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती आहे.

हार्दिक पटेलला आज न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाटीदार आरक्षण समर्थनार्थ २५ ऑगस्ट २०१५ रोजी हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथे एक रॅली काढली होती. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. त्यावेळी पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी हार्दिक आणि सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments