Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत 14 कोटींचे 25 लाख मास्क जप्त : अनिल देशमुख

मुंबईत 14 कोटींचे 25 लाख मास्क जप्त : अनिल देशमुख

After the result, the Shiv Sena will enter the Congress Alliance Says Anil Deshmukhमुंबई : कोरोनाचा धूमाकुळ सुरु असताना मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा वाढला आहे. हीच संधी साधून बनावट मास्क बाजारात आले आहेत. मुंबई पोलिसांनी अशा या टोळीचा पदार्फाश केला असून मुंबईत तब्बल 14 कोटी रुपये किंमतीचे मास्क जप्त केले आहे. देशातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

मुंबई क्राइम ब्रांचने मास्कचा मोठा साठा जप्त केला आहे.  या आरोपींनी मोठ्या प्रमाणात मास्कचा साठा करून ठेवला होता. तब्बल 25 लाख मास्क जप्त करण्यात आले आहे. याची किंमतही 14 कोटी इतकी आहे. हे मास्क काळ्याबाजारात विकण्याचा आरोपींचा हेतू होता. 2 रुपयांना येणारा हा मास्क 10 रुपयांमध्ये आणि 100 रुपयांचा मास्क हा 400 रुपयांमध्ये विकण्याचा डाव होता. याबात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments