Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्रालयासमोर वृद्ध महिलेचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर वृद्ध महिलेचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : पुन्हा मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी तात्काळ सदर महिलेला सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल केलं आहे. सखुबाई विठ्ठल झाल्टे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे.

मंत्रालय आत्महत्यालय झाल्यामुळे छतावरुन कुणी उडी मारुन आत्महत्या करु नये यासाठी नेटची जाळी बसवण्याची शक्कल लढविण्यात आली होती. सोशल मीडियावरही या बाबत चांगलीच टिंगळ टवाळकी करण्यात आली होती. एका आरोपी शिक्षा कमी करण्यासाठी मंत्रालयात गेला होता त्याचे काम न झाल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकारानंतर वृध्द महिलेने विषय घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेने पत्र लिहून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

गेल्या काही महिन्यांपासून मंत्रालयात किंवा मंत्रालय परिसरात आत्महत्येचे वेगवेगळे प्रयत्न झाल्याचे बघायला मिळाले. यातील धर्मा पाटील यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतरही आत्महत्येचे काही प्रयत्न झालेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments