Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात ऐन हिवाळ्यात पावसाळा!

राज्यात ऐन हिवाळ्यात पावसाळा!

मुंबई : ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.  सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे आजार वाढण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईसह,नवी मुंबई, जळगाव,औरंगाबाद, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, मलंगगड परिसरातही पावसाने काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली. सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे.  रायगड जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. पनवेल, रोहा भागात रिमझिम सरी कोसळल्या. पेण, वडखळ, परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. रायगडमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments