Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रपोटनिवडणुकीसाठी ‘विश्वजीत कदम’ यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

पोटनिवडणुकीसाठी ‘विश्वजीत कदम’ यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

Vishvajit Kadamमहत्वाचे…
१. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त होती जागा
२. पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी  मतमोजणी
३. पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता


सांगली: पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी, काँगेसकडून विश्वजित कदम यांनी आज अर्ज भरला. पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागी त्यांच्या मुलालाच उमेदवारी देण्यात आली आहे.
यावेळी काँगेसकडून माजी मुख्यमंत्री पृथीराज चव्हाण, सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार निरंजन डावखरे, कै. पतंगराव कदम यांच्या पत्नी विजयमाला कदम यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.

उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कडेगाव यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यलयात गर्दी केली होती. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे भाजप या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. “ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार न देता, ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती आम्ही करणार आहोत”, असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments