Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्र्यांच्या खातेवाटपाचा आज सोक्षमोक्ष होणार

मंत्र्यांच्या खातेवाटपाचा आज सोक्षमोक्ष होणार

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील खातेवाटपाचा घोळ आज शुक्रवारी सुटण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी ३० डिसेंबरला झाला. पण अद्याप नव्या मंत्र्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचं वाटप झालेलं नाही. मंत्र्यांचं खातेवाटप आज जाहीर होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली.

खातेवाटपावरून सध्या घोळ सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, तिन्ही पक्षांचे नेते कोणताही घोळ सुरु नसल्याचे बोलत आहे. मात्र, खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खातेवाटप जाहीर होण्याआधी कोणत्या मंत्र्याने कोणत्या दालनात बसायचे याचा निर्णय झाला आहे. मंत्र्यांसाठी बंगल्यांचे वाटपही झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सहाव्या मजल्यावर, ज्येष्ठ काँग्रेस नेते दिलीप वळसे पाटील यांना पाचव्या तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दुसऱ्या मजल्यावर ऑफिस देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः आदित्य यांच्या दालनाची पाहणी केली. नंतर प्रशासनाने आदित्य यांच्या ऑफिसची जागा सातव्या मजल्यावर निश्चित केली.

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मंत्र्यांच्या बैठकीसाठी मोठे सभागृह आहे. या सभागृहाच्या शेजारीच आदित्य ठाकरेंचे ७१७ क्रमांकाचे ऑफिस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना सहाव्या मजल्यावरचे उत्तरेकडील मुख्य दालन देण्यात आलंय. काही राज्यमंत्र्यांना विधानभवनातील कार्यालये देण्यात आली आहेत.

यांना मिळाले हे बंगले….

उपमुख्यमंत्री अजित पवारांना देवगिरी तर कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाणांना मेघदूत बंगला देण्यात आलाय. दिलीप वळसे पाटील यांना शिवगिरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सातपुडा आणि राजेश टोपे यांना जेतवन बंगला देण्यात आलाय. आदित्य ठाकरे यांना ६ अ हे निवासस्थान देण्यात आलंय. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ३६ जणांनी शपथ घेतली होती. या सर्वांना बंगल्यांचे वाटप झाले आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या ६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या मंत्र्यांचे बंगले वाटप नोव्हेंबर महिन्यातच झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच्या मातोश्री बंगल्यावर राहणार असले तरी त्यांना वर्षा बंगला देण्याचा निर्णय झालाय. मुख्यमंत्री महत्त्वाच्या सरकारी भेटीगाठींसाठी वर्षा बंगल्याचा वापर करत आहेत. छगन भुजबळ यांना रामटेक, जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन हे बंगले मिळाले आहेत. बच्चू कडू यांना रॉकी हिल टॉवर १२०२, विश्वजीत कदम यांना निलांबरी ३०२, सतेज उर्फ बंटी पाटील यांना सुरुची-३ आणि आदिती तटकरे यांना सुनीती-१० निवासस्थान देण्यात आलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments