Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे सुपूत्र शहीद संदीप सावंतांना अखेरचा निरोप

महाराष्ट्राचे सुपूत्र शहीद संदीप सावंतांना अखेरचा निरोप

Sandip Sawantसातारा : जम्मू आणि काश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानी सैन्याशी दोन हात करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थिवार त्यांच्या मुंढे या मूळ गावी लष्करी इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले होते.

२५ वर्षे वय असलेस्या शहीद संदीप यांच्यामागे पत्नी सविता आणि एक दीड महिन्यांची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. शहीद संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी  सातारा आणि परिसरातील जनतेने अलोट गर्दी केली.

कराड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते पार्थीव…

शहीद नाईक संदीप सावंत यांचे पार्थिव जम्मू काश्मीरहून पुण्याला आणले गेले. त्यानंतर त्यांचे पार्थिव साताऱ्यातील कराड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथील नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव मुंढे येथे अंत्यदर्शनासाठी आणले गेले. येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments