Sunday, May 10, 2026
Homeमहाराष्ट्रCAA : खासदार संजय राऊतांची जमात ए-इस्लामी हिंदला साथ

CAA : खासदार संजय राऊतांची जमात ए-इस्लामी हिंदला साथ

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात देशात संतापाची लाट उसळलेली आहे. जमात ए इस्लामी हिंद, एपीसीआर आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने या कायद्याला विरोध दर्शविला असून त्यानिमित्ताने पत्रकार संघात शनिवारी (४ जानेवारी) रोजी एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संजय राऊत या कायद्याविरोधात आणि केंद्र सरकार बाबत काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

जमात ए इस्लामी हिंद, असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल कैट्स आणि मुंबई मराठी पत्रकार संघाने उद्या शनिवारी पत्रकार संघात या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात संपूर्ण देशात आंदोलन सुरू आहे. सीएए आणि एनआरसीविरोधात होणाऱ्या कार्यक्रमात  शिवसेना नेते संजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. अशी माहिती जमात ए इस्लामी हिंदकडून देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राऊत यांच्यासह माजी न्यायामूर्ती बी. जी. कोळसे पाटील, ज्येष्ठ वकील मिहिर देसाई आणि युसूफ मुछालाही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments