Placeholder canvas
Tuesday, April 30, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र बोर्ड: 10 वी पुरवणी परीक्षा निकाल 30 ऑगस्टला होणार जाहीर, कसा...

महाराष्ट्र बोर्ड: 10 वी पुरवणी परीक्षा निकाल 30 ऑगस्टला होणार जाहीर, कसा पाहाल निकाल? 

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या मार्च महिन्यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी म्हणून घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल यंदा 30 ऑगस्ट 2019 दिवशी शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर शुक्रवारी 30 ऑगस्टला दुपारी 1 वाजता  mahresult.nic.in  या शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षण मंडळ मागील काही वर्षांपासून मार्च महिन्यातील परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच फेर परीक्षा घेते. यंदा दहावीची परीक्षा 17 ते 30 जुलै या काळात पार पडली. आता 30 ऑगस्ट दिवशी त्याचा निकाल जाहीर होणार आहे.

 कसा पहाल तुमचा 10 वी पुरवणी परीक्षा निकाल 2019?

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट  mahresult.nic.in  क्लिक करा.

Maharashtra SSC Supplementary Result 2019  या लिंकवर क्लिक करा.

रिल्झट लॉग इन पेज ओपन होईल.

त्यानंतर हॉल तिकीट नंबर, जन्मतारीख, आईचे नाव आणि इतर महत्त्वाची माहिती भरुन समिट बटणावर क्लिक करा.

Maharashtra SSC Supplementary Result 2019  निकाल पुढील पेजवर दिसेल.

तसंच तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता किंवा निकालची प्रत सेव्ह करु शकता.

यंदा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल अत्यंत निराशाजनक लागला होता. मार्च मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 88.38 टक्के इतका लागला असून लातूर विभागाचा निकाल मात्र 72.87 टक्के इतका लागला होता. तर एकूण निकाल 77.10 %इतका होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments