Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeमराठवाडालातूरबैलपोळा सणावर दुष्काळाची गडद छाया

बैलपोळा सणावर दुष्काळाची गडद छाया

काळ्याकुट्ट दाटून येणार्‍या नभाआड दडून बसलेला वरूणराजा काही केल्या बरसायला तयार नसल्याने शेतकर्‍यांचा जिव टांगणीला लागला आहे. परिसरात झालेली थोडीफार हिरवळही पावसाअभावी सुकून जात आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी येथे दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होत आहे. अशा परिस्थितीत उद्भवलेल्या अस्मानी संकटामुळे काळ्या आईच्या सेवेसाठी शेतकर्‍यांसोबत राब राब राबणार्‍या बैलपोळा सणावर गडद दुष्काळाची छाया पसरली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने लसंपत आले तरी मोठा पाऊस पडला नसल्याने नदी नाले कोरडेच आहेत. जुलै अखेर झालेल्या अल्पशा भिज पावसावर शेतकर्‍यांनी पेरणी केली, उगवणही झाली. मात्र आता दीर्घ उघडीपमुळे थोडीफार झालेली हिरवळही कोमेजून जात आहे. जुलै अखेर झालेल्या अल्पशा भिज पावसाच्या किलबिलाटाने अगोदरच कर्जाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकर्‍यांना आणखीन आर्थिक संकटात टाकले. कोवळी पिके सुकत असल्याचे विदारक चित्र समोर असल्याने या गंभीर परिस्थितीत बैल पोळा सण देखील दुष्काळाच्या सावटाखाली असल्याचे दिसून येत आहे. बैलांना घालण्यासाठी चारा नाही, शेतामध्ये पाणी नाही, पिके कोमेजून जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये नैराश्यच पसरले आहे. नदी, नाले, विहीरही कोरड्याच पडत असल्याने बैल धुवावे अथवा पोहणी घालावे कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

खांदेमळणीच्या दिवशी बैलांना धुतले जाते याशिवाय पोळ्यांच्या दिवशी परत एकदा धुवून शिंगे रंगवली जातात. बैलांना सजवून वाजत गाजत बँडच्या निनादात बैलाची मिरवणूक काढली जाते. परंतु बैल सजविण्यासाठी साहित्य बाजारात आले असताना खरेदी करण्यासाठी शेतकरी निरुत्साही दिसत आहेत. बाजारात पोळ्याचे साहित्य आले खरे. पण सण एक दिवसांवर असतानाही खरेदीसाठी म्हणावी तशी गर्दी दिसत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments