मुंबई – पारदर्शक कार्यप्रणाली व नागरिकांची सोय या बाबी केंद्रस्थानी ठेवत मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे यावर्षापासून म्हाडा सदनिका विक्री सोडत आता फेसबुकवर लाईव्ह करण्यात येणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण नागरिकांना http://www.facebook.com/mhadal२०१७ येथे पाहता येईल.
शुक्रवारी (१० नोव्हेंबर) मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील ८१९ सदनिकांची संगणकीय सोडत वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहामध्ये काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळास यंदा ८१९ सदनिकांकरिता सुमारे ६५ हजार अर्जदारांकडून यशस्वी प्रतिसाद मिळाला आहे. पण सोडत शुक्रवारी म्हणजे कार्यालयीन वेळेत आयोजित करण्यात आल्यानं अनेक अर्जदारांना रंगशारदा येथील कार्यक्रमात थेट सहभाग घेता येऊ शकणार नसल्याने सोडत सोशल मीडियाच्या फेसबुकवरुन लाईव्ह करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी दिलेत.
म्हाडाची सदनिका विक्री सोडत आता पाहा फेसबुकवर लाईव्हवर
RELATED ARTICLES