नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेवर महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार, उपमहापौरपदी काँग्रेसच्या नंदाकिनी म्हात्रे निवडूण आल्या. भाजपाने येथे तटस्थ भूमिका घेतली होती. शिवसेनेच्या उमदेवाराने माघार घेतली होती. आज दुपारी हात उंच करुन सदस्यांनी मतदान केले. नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीला शह देण्यासाठी येथे दगाफटका होऊ शकतो अशी चर्चा सुरु होती. मात्र येथे कोणताही दगाफटका न बसता राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले. विशेष म्हणजे या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले होते. यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली होती.
नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईकांचेच वर्चस्व
RELATED ARTICLES