Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeकोंकणठाणेयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पत्रकारीता अभ्यासक्रम 31 जुलैपर्यंत प्रवेशाची मुदत वाढवल

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पत्रकारीता अभ्यासक्रम 31 जुलैपर्यंत प्रवेशाची मुदत वाढवल

ठाणे- महाराष्ट्र सरकार व यु.जी.सी. मान्यता प्राप्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पत्रकारीता पदवीका ( डिप्लोमा एक वर्ष) व पदवी-डिग्री ( बीए ३ वर्ष) अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले असून विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानंतर विद्यापीठाने ३१ जुलै पर्यंत प्रवेशाची मुदत वाढवली आहे.

दोन्ही अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक अर्हता किमान बारावी उत्तीर्ण असून कोणत्याही वयाची व्यक्ती प्रवेश घेऊ शकतो. हा अभ्यासक्रम शासनमान्य असल्याने सरकारी व खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी हा कोर्स उपयुक्त ठरणारा आहे. पत्रकारीता, जाहीरात क्षेत्र, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया, पब्लिक रिलेशन्स आदी क्षेत्रासाठी लागणारे शिक्षण अभ्यासक्रमात शिकवले जाणार आहे.

प्रवेशासाठी संपर्क विद्यापीठ वेबसाईट तसेच आनंद विश्व कॉलेज. रघुनाथ नगर. पनामा कंपनी जवळ.. तीन हात नाका बस स्टॉप.. ठाणे पश्चिम. समन्वयक – शशिकांत कोठेकर 98218 51511, कार्यालय प्रवेश साठी
आकाश ढवळ 8291092511 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac , www.ycmou.ac.in वर नोंदणी करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments