Saturday, May 18, 2024
Homeकोंकणठाणेपितृछत्र हरपलेल्या, दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांसाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचा मदतीचा...

पितृछत्र हरपलेल्या, दिव्यांग व गरीब विद्यार्थ्यांसाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचा मदतीचा हात

ठाणे येथील सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे या संस्थेने प्रतिवर्षीप्रमाणे सुधागड तालुका ठाणे शहरवाशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक सहकार्य करण्यांत आले. पितृछत्र हरपलेल्या, दिव्यांग व गरीब अशा विद्यार्थांनी हया योजनेचा लाभ घेतला. ज्ञानराज सभागृह, पाचपाखडी ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात सुधागड तालुका ठाणे शहरवाशी यशस्वी तरुण उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. ठाणे शहर व सुधागड ग्रामीण भागांतील मार्च 2019 माध्यमिक शालांत परीक्षेत 90% व अधिक गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले तसेच सभासदांच्या 10वी, 12 वी व पदवीधर मुलांचा गौरव करण्यात येऊन 1 ते 9 वी च्या हुशार विद्यार्थाना शालेय साहित्याचे वाटप करण्यांत आले.

रोटरी क्लब ऑफ ठाणे चे नवनिर्वाचित अध्यक्ष अच्युत दामले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अशोक टिळक सर आणि उद्योजक विजय सागळे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बाबू घाडगे यांनी मागील वर्षाच्या शैक्षणिक कामाचे प्रमुख फोटोज व्हिडिओद्वारे दाखवून संस्थेच्या सुधागड ग्रामीण व ठाणे शहरातील कार्याचे सभागृहात दर्शन घडविले व सुधागड तालुक्यातील मुलांना शैक्षणिक, नोकरी व व्यवसायांत पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन व मदतीची गरज असल्याचे सांगून त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याचे विनंती वजा आवाहन केले. अच्युत दामले आपल्या मार्गदर्शनपर भाषणांत सांगितले की, मी प्रथमच तुमच्या संस्थेचे शैक्षणिक कार्य पाहत आहे. तरी तुमच्या या सामाजिक कार्याला रोटरी क्लब ऑफ ठाणे व मी स्वतः जेवढी मदत करता येईल ती करणार आहे. संस्थेचे हितचिंतक व देणगीदार सुरेश मेश्राम यांना सुधागड मित्र ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच पितांबरी प्रॉडक्ट प्रा. ली. व ढगडइ बँकेचे विशेष योगदान या कार्यक्रमास लाभले. संस्थेचे सरचिटणीस राजू पातेरे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार मानले. संस्थेचे चिटणीस अविकांत साळुंके यांचा यशस्वी उद्योजक म्हणून सत्कार केला सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मी हातात पैसे नसताना उद्योग सुरू करण्याचे धाडस केले त्यासाठी मला माझे वडील, भाऊ, वाहिनी व पत्नीने खूप मदत केली तसेच संस्थेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले मी सर्वांचे आभार मानतो.

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विठ्ठल घाडगे, शिक्षणसमिती प्रमुख वसंत लहाने व माजी अध्यक्ष विठ्ठल खेरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी सल्लागार रमेश सागळे, उपाध्यक्ष शंकर काळभोर, चिटणीस अविकांत साळुंके, खजिनदार विजय पवार, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, रघुनाथ इंदुलकर, प्रकाश वाघमारे, दत्ता सागळे, सुनील तिडके, सखाराम खामकर, विजय जाधव , मोहन भोईर, जनार्दन घोंगे, दत्तात्रय दळवी, गजानन जंगम, हरिश्चंद्र मालुसरे, अनिल सागळे, अनिल चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सल्लागार गणपत डिगे, सुरेश शिंदे, गोपीनाथ दुर्गे, प्रवीण तेलंगे यांची उपस्थिती लाभली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments