Sunday, June 30, 2024
Homeकोंकणठाणेउध्दव ठाकरे यांचा वाढदिवस विशेष व मतिमंद मुलांच्या सहवासात शिवकायस्थ संस्थेने केला...

उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस विशेष व मतिमंद मुलांच्या सहवासात शिवकायस्थ संस्थेने केला साजरा

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस ठाणे शहरातील विशेष व मतिमंद मुलांच्या सहवासात साजरा करुन त्या मुलांच्या आनंदात भर घालण्याचे काम शिवकायस्थ संस्थेने केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपला वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करावा असे आवाहन केल्यानंतर शिवकायस्थ संस्थेने उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस ठाणे शहरातील धर्मवीर आनंद दिघे जि शाळेतील विशेष व मतिमंद मुलांच्या शाळेत करण्याचे ठरविले. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवशी विशेष व मतिमंद मुलांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेसाठी विविध प्रकारचे साहित्य संस्थेतर्फे भेट देण्यात आले. शिवाय वाढदिवसानिमित्त एक भला मोठा केक मतिमंद मुलांच्या हस्ते कापण्यात आला व त्या केकचे वाटप करण्यात आले. यासमयी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

शिवकायस्थ संस्थेच्या या विधायक कार्यक्रमासाठी सर्वश्री तुषार राजे, समीर पोतनिस, विजय देशमुख, अरविंद कारखानिस, संजय कर्णिक, राजन श्रृंगारपुरे, अशोक कुळकर्णी, संदिप सुळे, विनायक प्रधान, सागरिका कर्णिक, स्वाती कुळकर्णी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवकायस्थ संस्थेतर्फे असेच उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे याप्रसंगी जाहीर करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमासाठी बहुमोल सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments