Sunday, June 30, 2024
Homeकोंकणठाणेआनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

ठाणे – आनंद विश्व गुरुकुल आणि महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना व नॅशनल कॅडेट कोर यांच्या वतीने ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा सा. बां. मंत्री तथा आरोग्यमंत्री महाराष्टः राज्य एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फ्रेरणेने मौजे पिंपरी, कल्याण शिळफाटा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, स्थानिक आमदार सुभाष भोईर , उप वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, शारदा  एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, सचिव डॉ. प्रदीप ढवळ, खजिनदार अक्षर पारसनीस आदी मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. फ्रदीप ढवळ यांच्या संकल्पनेतून शाळा तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित केलेल्या 5000 विविध फ्रकारच्या बिया तसेच फणस, जांभूळ, पिंपळ, कडुनिंब, महोगनी, बकुळ, चाफा, पेरु, बदाम, वड अशा तब्बल 350 रोपट्यांची लागवड यावेळी करण्यात आली. वृक्षारोपणाची पूर्वतयारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकां मार्फत प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या फ्रकल्पास वन खाते तसेच ठाणे महानगरपालिका वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वृक्षारोपणाच्या वेळी आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ रात्र महाविद्यालयाच्या फ्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे फ्राचार्य ऍड. सुयश फ्रधान, आनंद विश्व गुरुकुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या फ्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर, विधी महाविद्यालय, ज्येष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, नॅशनल कॅडेट कोरच्या कॅडेट्स तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments