Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeकोंकणठाणेशिवसेना नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा; सेना-भाजपात जुंपली!

शिवसेना नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा; सेना-भाजपात जुंपली!

Mahesh Gaikwad Shiv Sena Nagar Sevak,Mahesh, Gaikwad, Shiv, Sena, Nagar, Sevakकल्याण : कल्याण – डोंबिवली महापालिकेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी कंत्राटदाराकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी शिवसेना भाजपामध्ये जुंपली आहे.
नगरसेवक महेश गायकवाड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. एवढेच नाही तर महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर खोट्या गुन्हात अडकवण्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आमदारांनीही आरोप केला आहे.

कल्याण पूर्वमध्ये महेश गायकवाड यांच्या प्रभागात एका खासगी कंपनीकडून खोदकाम करून केबल टाकण्याचे काम सुरु आहे. काम सुरु असताना महेश गायकवाड यांचे समर्थक पोहोचले आणि खोदकाम करणाऱ्या कामगारांना मारहाण केली, असा कंत्राटदाराचा आरोप आहे. तसेच महेश गायकवाड यांनी त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी मागितली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश गायकवाड यांनी आरोप फेटाळले…

महेश गायकवाड यांनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हे आरोप फेटाळले. या प्रकरणावरून शिवसेना भाजपमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments