Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeकोंकणठाणेराज यांच्या समर्थनात ठाणे मध्ये मनसे कार्यकात्याची आत्महत्या

राज यांच्या समर्थनात ठाणे मध्ये मनसे कार्यकात्याची आत्महत्या

ठाणे: ठाण्यातील कळवा, विटावा भागात राहणाऱ्या मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ईडीच्या नोटीसनंतर राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ स्वत:ला पेटवून घेतल्याने त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.

मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ठाण्याच्या विटावा भागात राहणाऱ्या 26 वर्षीय प्रवीण चौघुले या तरुणाने आत्महत्या केली. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्याची बातमी ऐकूण गेल्या दोन दिवसांपासून तो अस्वस्थ होता. मागील दोन दिवसात फेसबुकवर त्याने राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.या चिंतेतूनच काल अचानक त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

प्रवीण चौघुलेला जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रवीण विटावा भागात एकटा राहत होता. मनसे पक्षाचं तो काम करायचा. राज ठाकरे यांना मिळालेल्या ईडीची नोटीसची बातमी आल्यानंतर त्याने स्वतःला पेटवून घेतल्याचं त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं.मात्र याबाबत पोलीस अधिक तपास करत असून प्रवीणच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments