Tuesday, December 3, 2024
Homeकोंकणठाणेमनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले,धक्कादायक खुलासे समोर

मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले,धक्कादायक खुलासे समोर

killers-throw-mansukh-hiren-body-in-kalwa-creek-ats-found- ATS found evidence-news-updates
mansukh-hiren-death-case-two-person-arrested-by-ats-news-updates

मुंबई: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एटीएसच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. हत्या करण्यापूर्वी हिरेन यांना क्लोरोफार्म सुंगवून बेशुद्ध करण्यात आलं. यानंतर त्यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकण्यात आलं, अशी धक्कादायक माहिती एटीएसच्या हाती लागली आहे अशी माहिती समोर आली आहे.

25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनने भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची असल्याचं उघड झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री मनसुख याला ताब्यात घेऊन ATS च्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. यावेळी त्याने आपली गाडी चोरी झाली होती आणि त्याबाबत आपण गुन्हा दाखल केला असल्याचं सांगीतल होत, असं सूत्रांनी सांगितलं.

हिरेन यांची हत्या झाल्यानंतर एटीएसच्या तपासात अनेक गोष्टी उलगडल्या आहेत. हिरेन यांची हत्या झाली. त्या रात्री आरोपी शिंदे याने हिरेन यांना वेगळया नावाने बाहेर बोलावलं होतं. त्यानंतर त्याला कळवा खाडी येथे घेऊन गेले. यावेळी शिंदे यांच्या सोबत आणखी तीन लोक होते, अशी माहिती एटीएसच्या हाती लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सचिन वाझेही त्या ठिकाणी होता?

मनसुख याला कळवा खाडी येथे आणल्या नंतर क्लोरोफार्मचे रुमाल त्याच्या तोंडा नाका जवळ जबरदस्तीने लावण्यात आले. त्यामुळे गुदमरल्याने मनसुख आणि तोंडावर रुमाल ठेवणाऱ्यांमध्ये झटापट झाली. या झटापटीत मनसुख यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. त्यानंतर मनसुख याला ठार मारून खाडीच्या पाण्यात टाकण्यात आलं.

यावेळी एकाने क्लोरोफार्म आणलं होतं. हिरेन यांनी प्रतिकार केल्यास त्यांना हाताळण्यासाठी इतर दोन लोक त्या ठिकाणी होती. त्याचप्रमाणे सचिन वाझेही त्या ठिकाणी जवळच उभा असल्याचं एका आरोपीने आपल्या जबाबात सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्य म्हणजे हिरेन यांना खाडी परिसरात आणण्यासाठी वोल्वो गाडीचा वापर केल्याचं सूत्रांच म्हणणं आहे. क्लोरोफार्म बाबत एटीएस अधिकाऱ्यांनी सविस्तर जबाब नोंदवला आहे. हिरेन यांच्या तोंडात सापडलेले रुमाल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट लवकरच उपलब्ध होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments